Sunday, May 5, 2024
Homeनाशिक'लॉजिस्टिक पार्क'ला मिळणार गती; तांत्रिक सल्लागार कंपनीची निवड

‘लॉजिस्टिक पार्क’ला मिळणार गती; तांत्रिक सल्लागार कंपनीची निवड

देवळाली कॅम्प | वार्ताहर

केंद्रसरकारने देशभरातील ३५ शहरांमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश करण्यात आला आहे. या पार्क उभारणीच्या प्रशासकीय कामाला गती मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून क्नॉईट फ्रँक (Knight frank) या संस्थेची तांत्रिक सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली आहे….

- Advertisement -

नाशिक शहरात सुमारे शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क प्रकल्प होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळण्या बरोबरच हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांच्या तसेच लघु उद्योजकांच्या मालासाठी कोल्ड स्टोरेज, वेअर हॉऊस उभारण्यात येणार असल्याची माहितीही खा. गोडसे यांनी दिली. हा पार्क कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून केंद्राकडून क्नॉईट फ्रँक (Knight frank) या संस्थेची नुकतीच तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर असून सात ते आठ मोठ्या औद्यागिक वसाहती आहेत, ज्यात हजारो लघुउद्योजक आहेत.

या सर्व घटकांना त्यांचा उत्पादीत माल विक्रीसाठी दळणवळणाचा मोठा खर्च येतो. तसेच शेतकऱ्यांकडे द्राक्ष आणि कांदा साठवणुकीसाठीची व्यवस्था नसल्याने त्यांची कुचंबना होत असते.

यातुनच नाशिक शहरालगत लॉजिस्टिक पार्क उभारण्यात यावा, यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न करुन हा पार्क नाशिक येथे मंजूर करुन घेतला आहे. क्नॉईट फ्रँक कंपनीची शासनाने तांत्रिक सल्लागारची नेमणूक केल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या