Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरे ग्रामस्थांचा प्रवरा पात्रातील वाळू विक्रीला विरोध

कोपरे ग्रामस्थांचा प्रवरा पात्रातील वाळू विक्रीला विरोध

माहेगाव (वार्ताहर) –

राहुरी तालुक्यातील कोपरे ग्रामसभेत प्रवरानदी पात्रातील शासनाच्या वाळू लिलावाला ग्रामस्थांनी कडाडून

- Advertisement -

विरोध केला. जीव गेला तरी चालेल, पण नदीपात्रातील एकही खडा उचलू देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्याने तसा ठराव क्रमांक 1 मध्ये करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांनी राहुरीचे तहसीलदार यांना कोपरे गावातील प्रवरा पात्रातील वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामसभा घेऊन गावाची मान्यता घेण्याचे आदेश दिले. त्यावरून मंडलाधिकारी बी. के. मंडलीक यांनी उपस्थित राहून वाळूचा लिलाव केला तर गावाचे विकासात्मक फायदे करू, असे सांगताच भगीरथ जगताप यांनी आमचा वाळू लिलाव करण्यास विरोध आहे. आम्हाला तुमचे काहीच नको, आज वाळू गेली तर भविष्यात पिढी आम्हाला माफ करणार नाही.

गावातील शेती उद्ध्वस्त होऊन पिण्यासाठी पाणी राहणार नाही. जनावरांना चार्‍याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. आमच्या गावातील शंभर टक्के लोक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्याच शेतीला भविष्यात पाणी नाही राहिले तर आम्ही आपली उपजिविका कशी चालवायची? प्रशासनाने प्रवरा नदीपात्रातील वाळू विक्रीस परवानगी देऊ नये, त्यास आमचा विरोध आहे. असे म्हणताच त्यास साहेबराव जगताप यांनी त्यांच्या सुचनेला अनुमोदन दिले.

यावेळी सरपंच कविता जाधव, उपसरपंच प्रियंका जगताप, ऱामभाऊ जगताप, दत्तूभाऊ जाधव, सतीश साठे, शनेश्वर मोरे, गयाबाई घोडके, गयाबाई जगताप, झुंबरबाई माळी, माजी सरपंच भगीरथ जगताप, साहेबराव जगताप, नानासाहेब जगताप, बाबासाहेब मोरे, केरु शिंगाडे, ग्रामसेवक भागवत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या