कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात नगरपालिका महसूल प्रशासन आणि पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली आहे. अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवत पत्राशेड हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे.
- Advertisement -

शहरात पिढ्यान्पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याचा धाक दाखवत प्रशासनाने ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान प्रांताधिकारी माणिक आहेर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार महेश सावंत आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा उपस्थित आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)