Sunday, October 4, 2026
HomeनगरAccident News : दोन दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Accident News : दोन दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

तालुक्यातील धारणगाव रोडवर मुर्शतपूर फाट्याच्या पुढे नरोडे वस्ती परिसरात रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बाळासाहेब दामू घुमरे (वय 55, रा. सांगावी, ता. सिन्नर) यांचा मृत्यू झाला असून अनिल खाजेकर (वय 45, रा. कोळपेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील धारणगाव रोड, मुर्शतपूर फाट्याच्या परिसरात दोघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बाळासाहेब दामू घुमरे यांचा मृत्यू झाला असून अनिल खाजेकर या दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक माहिती घेतली. बाळासाहेब घुमरे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

गंभीर जखमी अनिल खाजेकर यांना कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाताबाबत कोपरगाव तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...