Friday, May 3, 2024
Homeनगरसोमवारी कोपरगावात 20 रुग्ण करोना संक्रमित

सोमवारी कोपरगावात 20 रुग्ण करोना संक्रमित

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 11 ऑक्टोबर रोजी सापडलेल्या 8 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 201 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

- Advertisement -

त्यात 11 रुग्ण तर अहमदनगर नगर येथे पाठवलेल्या रुग्णांपैकी 1 तसेच खासगी लॅब मधील 8 रुग्ण असे 20 रुग्ण पॉझिटिव्ह आले. 5 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 20 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील 1, ओमनगर येथील 1, साईबाबा काँनर येथील 1, मेनरोड येथील 1, अंबिकानगर येथील 1, धारणगाव रोड येथील 1, टाकळी फाटा येथील 1, गोदामगल्ली येथील 2, तर ग्रामीण माहेगाव येथील 1, सुरेगाव येथील 3, भोजडे येथील 2, चास येथील 2, कान्हेगाव येथील 1, देर्डे कोर्‍हाळे येथील 1 असे दिवसभरात ऐकून 20 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

तर 5 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 12 ऑक्टोबर पर्यंत 2 हजार 24 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 84 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. 1 हजार 900 रुग्ण बरे झाले आहेत. तर आज पर्यंत 11 हजार 237 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 18.1 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.77 टक्के असे आहे. तर 36 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या