रांजणगाव देशमुख । वार्ताहर
राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगार प्रमुखांच्या चुकीच्या नियोजनामुळे शुक्रवारी ( दि. २३ ) अनेक विद्यार्थ्यासह विद्यार्थींनीचे व इतर प्रवाशांचे प्रंचड हाल झाल्याचे पहायला मिळाले.
कोपरगाव- सोनेवाडी बससह काही बस सोडण्यात न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शेवटी काही सुज्ञ पालकांनी आपल्या मुलांसह परिसरातील मुला-मुलींना आपल्या खासगी वाहनातून कोपरगावला जावून आणावे लागले. तर काहींनी पुणतांबा फाट्यावर पायी येवून खासगी ट्रक व मिळेल त्या वाहनांचा सहारा घ्याला लागला. सायंकाळी वाढलेला पावसाचा जोर त्यातच परिसरात असलेली बिबट्याची भीती त्यामुळे अनेक पालक मुले घरी येईपर्यंत दहशतीखाली होते.
हे हि वाचा : Bus Accident : शिवशाही बसचा भीषण अपघात, गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात महामार्गावरच…
सायंकाळी निघणारी बस केव्हा सुटेल असे जेव्हा विद्यार्थ्यानीनी चौकशी केली तेव्हा दहा मिनिटात बस सुटेल असे वारंवार सांगण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजले तरी ते दहा मिनिटे संपलीच नाही.त्यानंतर भरपावसात अनेक मुली पुणतांबा फाट्यावर पोहचल्या. तेथून खासगी वाहनातून त्यांनी पोहेगाव-रांजणगावपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यान मुलींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे याबाबत संताप व्यक्त केला.
पोहेगाव परिसरातील मनेगाव, रांजणगाव देशमुख, जवळके, सोनेवाडी, बहादरपूर, वेस, अंजनापुर, धोंडेवाडी, शहापुर, बहादरबाद येथील अनेक पालक आपल्या मुलांची वाट पहात थांबले होते. बिबट्याच्या भीतीमुळे आपले मुले घरी कसे पोहचतील ही चिंता त्यांना लागून राहिली होती. याबाबत आगारप्रमुख यांना कालच्या झालेल्या प्रकाराबद्दल माहिती विचारली असता प्रासंगिक करारामुळे बस नव्हती असे एक वाक्य बोलून फोन बंद केला. त्यानंतर त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला पंरतु त्यांनी फोन उचललाच नाही.
हे हि वाचा : हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना! पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO
कोपरगाव आगारातून सुटणारी रांजणगाव देशमुख मुक्कामी बस देखील मागील अनेक दिवसांपासून अशीच अचानक बंद करण्यात आली आहे. ही मुक्कामी गाडी बंद करून लोणी मार्गे संगमनेर सुरू करण्यात आली आहे. रांजणगाव मुक्कामी बंद करुन लोणी मार्गे सांगमनेर का सुरु करण्यात आली.कोपरगाव ते रांजणगाव दरम्यानच्या विद्यार्थी व प्रवाशांची गौरसोय करुन कोणाच्या सोयीसाठी लोणी मार्गे संगमनेर बस सुरु करण्यात आली आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दोन्ही स्विय्य सहाय्यकांचे फोन बेदखल
सोनेवाडी बस का सोडत नाही. विद्यार्थी व इतर प्रवाशी अडकुन पडले आहेत त्यामुळे ही बस सोडण्यात यावी यासाठी दोन्हीकडच्या स्विय्य सहाय्यकांनी आगार प्रमुखांना फोन करून बस सोडण्याची विनंती केली. पंरतु वेळेत बस सोडलीच नाही.
हे हि वाचा : मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांच्या चुकांवर ठेवले बोट; सरकारवर ही ओढले ताशेरे