Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमएलसीबीनंतर कोतवाली पोलिसांकडून झेंडीगेटमध्ये छापेमारी

एलसीबीनंतर कोतवाली पोलिसांकडून झेंडीगेटमध्ये छापेमारी

कत्तलखान्यातून सुमारे अडीच टन गोमांस जप्त || दोघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एलसीबीच्या पोलिसांनी झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर रविवारी पहाटे छापेमारी केल्यानंतर कोतवाली पोलिसांनीही रविवारी रात्री बेपारी मोहल्ला येथील कत्तलखान्यावर छापा टाकून सहा लाख 60 हजाराचे सुमारे अडीच टन गोमांस जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल हक फकीर मोहंमद कुरेशी (वय 52) व नफिस कुरेशी (वय 27 दोघे रा. आरआर बेकरी समोर, झेंडीगेट) अशी त्यांची नावे आहेत. तसेच झेंडीगेट परिसरातील दुसर्‍या एका ठिकाणी कारवाई करून 26 हजाराचे 130 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी सलिम मुसा शेख (वय 26, रा. कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी केली.

- Advertisement -

कुरेशी मस्जिद शेजारी, आरआर बेकरी समोर, बेपारी मोहल्ला, झेंडीगेट येथे एका ठिकाणी गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल होत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी महिला सहायक निरीक्षक योगीता कोकाटे, अंमलदार इनामदार, तानाजी पवार, दीपक रोहकले, सुरज कदम, लोळगे, सुजय हिवाळे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी 11:10 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे अडीच टन गोमांस जप्त केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या