Monday, June 15, 2026
HomeनगरKarjat : कुकडी कालव्यात अज्ञात स्त्री-पुरुषाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Karjat : कुकडी कालव्यात अज्ञात स्त्री-पुरुषाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत (Karjat) तालुक्यातील कुकडी कालव्यात (Kukadi Canal) एका अज्ञात स्त्री व पुरुषाचे मृतदेह (Male And Female Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या कर्जत (Karjat) तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू असून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होत आहे. दरम्यान, येसवडी चारीतील कुळधरण व पिंपळवाडी गावांच्या शिवारादरम्यान एका स्त्रीचा (वय अंदाजे 50 वर्षे) व पुरुषाचा (वय अंदाजे 55 वर्षे) मृतदेह पाण्यात वाहत येताना नागरिकांच्या निदर्शनास आला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तातडीने कर्जत पोलिसांना माहिती दिली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस (Karjat Police) घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ते नेमके कोणाचे आहेत, कुठून वाहत आले आहेत आणि त्यांचा मृत्यू अपघाती बुडाल्याने झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

घारगावमध्ये पोलिसांचा छापा; ७० लिटर ताडी दारूसह महिला जेरबंद

0
घारगाव । प्रतिनिधी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका 'फिटनेस जिम'च्या पाठीमागे बेकायदेशीररित्या ताडी दारू विकणाऱ्या एका महिलेवर घारगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी...