Friday, May 3, 2024
Homeनगरकुकडी : 24 तासांत 2347 दलघफू पाणी दाखल, डिंभे निम्मे भरले

कुकडी : 24 तासांत 2347 दलघफू पाणी दाखल, डिंभे निम्मे भरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीगोंदा (Shrigonda), पारनेर (Parner) आणि कर्जतला (Karjat) वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील (Kukadi Project) धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात तब्बल 2347 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण पाणीसाठा (Water Storage) 9090 दलघफू (30.63 टक्के) झाला आहे.

- Advertisement -

सायंकाळी हा साठा 33 टक्क्यांच्या पुढे गेला होता. गतवर्षी या प्रकल्पात 6130 दलघफू (20.66 टक्के) पाणी होते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता डिंभे धरणाची 13.50 टीएमसी आहे. या धरणात सर्वाधिक 1241 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने काल सकाळी 6463 दलघफू (44 टक्के) पाणीसाठा झाला होता. पाण्याची आवक सुरूच असल्याने हे धरण उशीरा निम्मे भरले.

त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येडगाव धरणात 1426, माणिकडोह 2782, वडजमध्ये 716 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातील साठा 52 टक्क्यांवर पोहचला आहे. चिल्हेवाडी धरणात 348 दलघफू पाणी आहे. या प्रकल्पातील पाणी साठ्यावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत येथील शेतकरी रब्बी पिकाचे नियोजन करीत असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या