Friday, May 3, 2024
Homeनगरऊस भावाच्या स्पर्धेत कुकडी कारखाना मागे राहणार नाही

ऊस भावाच्या स्पर्धेत कुकडी कारखाना मागे राहणार नाही

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सह. कारखाना, पिंपळगाव पिसा मागील वर्षाचे राहिलेले शेतकर्‍याच्या उसाचे

- Advertisement -

प्रति टन 500 रुपयांप्रमाणे पेमेंट येत्या 30 ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतकर्‍याच्या खात्यात वर्ग करून चालू गळीत हंगामातील उसाला जास्तीत जास्त बाजार भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.

गुरुवारी (दि. 8) कारखान्याचा 17 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याप्रसंगी माजी आ. राहुल जगताप बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी ते म्हणाले की कारखान्याच्या मागील गळीत हंगामातील साखरेला उठाव नसल्याने सुमारे 53 कोटींची साखर गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. तर काही शेतकर्‍यांचे मागील गळीत हंगामाचे 500 रुपये प्रति टन प्रमाणे सुमारे साडेतीन कोटी रुपये देणे बाकी आहे. तेही येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अदा केले जाईल.

तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने शेवटपर्यंत कारखाना सुरू ठेवला जाईल.या बाबत शेतकर्‍यांनी कोणतीही काळजी करू नये.

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांना आधुनिक पद्धतीची जीपीएस प्रणाली बसवून वाहतूक व वजन काटा प्रणाली अद्ययावत करून शेतकर्‍यांच्या उसाचे वजन व बील तत्काळ मोबाईल एप्लिकेशन्सद्वारे पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असे यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा साखर संचालक घनःश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अनिल वीर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, पंचायत समिती सभापती गीतांजली पाडळे, माजी नगरपालिका अध्यक्ष गटनेते मनोहर पोटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या