नाशिक । प्रतिनिधी Nashik
आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेला कामाची तयारी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिल्याने मनपा प्रशासन झटकून कामाला लागले असून मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी अधिकार्यांची बैठक घेऊन कामाची दिशा व गती यावर चर्चा सुरू केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये आहे. त्यासाठीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करणे, राज्य शासनाच्या माध्यमातून शिखर समिती गठित करणे, कामांची आखणी करणे, त्यासाठींच्या निधीचे नियोजन करणे, कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करणे, कामाची दिशा ठरवणे या सर्व प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाच्या विविध घडामोडींमुळे त्यावर निर्णय होऊ शकले नाही.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मनपाला त्यांना पूर्वनिर्धारित कामांना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले असून, कामांची पूर्तता करून नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे कामही गतिमान करण्याच्या सूचना दिली आहे.मनपाआयुक्त भाग्यश्री बनायत यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सिंहस्थ पूर्व कामांची स्थिती जाणून घेतली. त्या कामांना तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या नियोजनाची माहिती घेऊन गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
या कामांसाठी लागणारा निधीबाबत बोलताना ज्या कामांचा निधी उपलब्ध आहे, ही कामे तातडीने करावयाची आहे. इतर कामांच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी स्पष्ट केले.