Sunday, April 12, 2026
Homeनाशिककुंभमेळा 2027 : शाहीस्नान तारखा घोषित

कुंभमेळा 2027 : शाहीस्नान तारखा घोषित

त्र्यंंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

आखाडा परिषदेचे ( Aakhada Parishad ) महामंत्री हरीगिरीजी महाराज यांच्याकडून त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 ( Kumbhmela 2027 )शाहीस्नान ( Shahisnan) पर्वणी तारखा जाहीर करण्यात आल्या. गुरुपुष्यामृत मुहूर्तावर कुंभमेळ्याची माहिती यावेळी घोषित करण्यात आली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने तिथी ज्योतिषशास्त्रानुसार काढण्यात आल्या. यावेळी श्रीपंच दशमान जुना अखडा राज्य अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, साध्वी शैलाजा माता, त्र्यंबक आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरनंद सरस्वती महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर तसेच नगरपालिकेचे प्रतिनिधी, पुरोहित संघ प्रतिनिधी, ग्रामस्थ, साधू , महंंत, साध्वी उपस्थित होते.

2016 च्या कुंभमेळ्यापेक्षा तिप्पट गर्दी 2027 मध्ये होईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने भरघोस निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्रिवेणी तुंगार (उपनगराध्यक्ष), कैलास चोथे दीपक लोणारी, पुरोहित संघाचे प्रतिनिधी, त्रिविक्रम जोशी, राजेश दीक्षित तसेच श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सचिव श्रीमंहत ठाणापती उपस्थित होते.

गुरुपुष्याच्या मुहूर्तावर सिंहस्थाच्या तारखा जाहीर झाल्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने, भाविकांच्या सोयीच्या रेल्वेच्या दृष्टीने सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे महामंंत्री हरीगिरीजी महाराज म्हणाले. यावेळी कुशावर्त तीर्थावर गंगापूजन करण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी तारखा

* सिंहस्थ ध्वजारोहणः31 ऑक्टोबर 2026

* प्रथम शाहीस्नान : 2 ऑगस्ट 2027

* द्वितीय शाहीस्नान : 31 ऑगस्ट 2027

* तृतीय शाहीस्नानः12 सप्टेंबर 2027

* सिंहस्थ समाप्ती : 28 सप्टेंबर 2028

ताज्या बातम्या

Ahilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका तरूण कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक...