Friday, September 11, 2026
Homeक्राईमAhilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

Ahilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष || कोतवालीत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका तरूण कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात श्रीरामपूर येथील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार संतोष हासे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर शहरातील शिवनेरी मार्ग, स्टेशन रोड परिसरात राहणार्‍या 29 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. ते व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांची ओळख ओकार संतोष हासे याच्याशी झाली होती. हासे याने फिर्यादीचा विश्वास संपादन करत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत हासे याने वेळोवेळी विविध कारणे सांगत फिर्यादीकडून मोठ्या रकमा आपल्या खात्यावर जमा करून घेतल्या. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असे आश्वासन देत हासे याने एकूण 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपये उकळले.

मात्र, बराच कालावधी उलटूनही हासे याने ना कोणताही परतावा दिला, ना मूळ रक्कम परत केली. यामुळे संशय आल्याने फिर्यादीने हासे कडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला. तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...