Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKurla Best Bus Accident: कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू,...

Kurla Best Bus Accident: कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी, चालकाला अटक

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई | Mumbai
मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या अपघातात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मुंबईमधील कुर्ला भागातील एलबीएस रोडवर हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे, तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी बसचालक संजय मोरे याला अटक केली आहे.

कुर्ला पश्चिमेकडील आंबेडकर नगर भागात ही दुर्घटना घडली. ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जात होती. सध्या या अपघातातील जखमींवर सायन, कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे कुर्ला स्टेशन भागातील बस सेवा खंडीत करण्यात आली असून इथल्या सर्व बससेवा पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या अपघातात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहे. काल अपघातानंतर तिघांचा तात्काळ मृत्यू झाला होता. तर उपचार सुरु असलेल्या दोघांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. पोलिसांकडून बस चालक संजय मोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानं पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती दिली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

चालक मद्यधुंद की बसचे ब्रेक फेल?
अत्यंत वेगाने आलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रॉनिक बसने गर्दीत घुसून अनेकांना चिरडले. तसेच रस्त्यावरील अनेक वाहनांनाही जोरदार धडक देत त्यांचा चेंदामेंदा केला. या बसने अवघ्या १०० मीटरच्या अंतरात ४० हून अधिक वाहनांना धडक दिली. मात्र, हा भीषण अपघात कशामुळे झाला हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. ज्या बसचा अपघात झाला त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद होता की बसचे ब्रेक फेल झाले होते ? त्याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांच्या मते ड्रयव्हर हा मद्यधुंद होता. तर झोन ५ चे डीसीपी गणेश गावडे यांच्या सांगण्यानुसार या अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
कुर्ला बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बस अपघात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलेय. कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. त्याशिवाय मृताच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या