
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणात (TET Paper Leak) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दीर्घ काळापासून फरार असलेला मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला (Bijendra Gupta) बिहारमधून अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. भिवंडी पोलिसांच्या (Bhiwandi Police) विशेष पथकाने बिहारमध्ये (Bihar) मोहिम राबवत ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजेंदर गुप्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. त्याला पकडण्यासाठी बिहारसह अनेक राज्यांत सातत्याने पोलिसांकडून छापे टाकण्यात येत होते. अखेर पोलिसांनी त्याला बिहारची राजधानी पाटण्यातून बेड्या ठोकल्या आहे.
संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा
TET पेपर लीक प्रकरणात वीरेंद्र कुमार गुप्ता याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याची चौकशी केल्यानंतर संपूर्ण पेपर लीक नेटवर्क, यामध्ये सहभागी असलेले इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि या कटाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे.
भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे TET पेपर लीक प्रकरणाच्या तपासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांविरोधातही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




