Friday, May 3, 2024
Homeनाशिकइमारतीचे रंगकाम करताना पडून मजुर ठार

इमारतीचे रंगकाम करताना पडून मजुर ठार

नाशिक | Nashik

इमारतीचे रंगकाम करत असताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.९) दुपारी घडली.

- Advertisement -

रविंद्र गणपत निसार (२४, रा. भोसला मिलिटरी स्कुल जवळ, गंगापूर रोड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसला मिलीटरी स्कुलजवळ नवीन बांधकाम झालेल्या इमारतीचे रंगकाम सुरू असताना तोल जाऊन निसार हा खाली पडला. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या