अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याहीक्षणी जमा होऊ शकतो. कारण, या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास भागाने शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. 30 जुलै (बुधवारी) शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येत असतात.
- Advertisement -
दरम्यान, माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.




