Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्याLadki Bahin Yojana : फेब्रुवारीचे १५०० रुपये मिळाले, मार्चचे कधी मिळणार? आदिती...

Ladki Bahin Yojana : फेब्रुवारीचे १५०० रुपये मिळाले, मार्चचे कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

मुंबई | Mumbai

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यातील हप्ता (Installment) जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर आता याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

- Advertisement -

मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतील तीन हजार रुपये एकत्रित देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हप्त्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत २ कोटी ५२ लाख महिलांच्या खात्यात शुक्रवारी सायंकाळपासून पैसे (Money) जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असले तरी जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असं सांगत योग्यवेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या २१०० रुपये देण्याबाबत निर्णय कधी होणार? याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागलेलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...