Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशPhoto : देशभरात शेतकऱ्यांचा रेल रोको

Photo : देशभरात शेतकऱ्यांचा रेल रोको

दिल्ली l Delhi

कृषी कायद्यांविरोधात (Three farm laws) चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer Movement) संयुक्त शेतकरी मोर्चाने (Sayukta kisan Morcha ) आज देशभरात रेल रोको (rail roko) आंदोलन सुरू केले आहे.

- Advertisement -

लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur Kheri incident) घडलेली हिंसक घटना विस्मरणात जाऊ शकत नाही. आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं आज शेतकऱ्यांनी (farmers) सहा तासांचा रेल्वे बंद पुकारला आहे. सकाळी १० वाजेापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोनल केले जाणार असून आंदोलनकर्ते ४ वाजेपर्यंत रेल्वे रुळावर बसून राहणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रेल रोकोच्या (rail roko) पार्श्वभूमीवर लखनऊ जिल्ह्यात कलम १४४ ची घोषणा पोलिसांनी केलीआहे. रेल रोकोमध्ये सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस (police) कारवाई करतील.

तसंच कुणीही सामान्य परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (NSA) कारवाई करण्यात येईल, असंही लखनऊ पोलिसांनी म्हटलं आहे.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे की, आपल्याला रेल्वे कुठं रोखायची आहे. भारत सरकारनं आमच्याशी या संदर्भात अद्याप काहीही चर्चा केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या