Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यालखीमपूर खेरी : किसान शहीद अस्थिकलश यात्रा दिवाळीनंतर नाशकात

लखीमपूर खेरी : किसान शहीद अस्थिकलश यात्रा दिवाळीनंतर नाशकात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मधील लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) येथे चार शेतकर्‍यांना (Farmers) चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले…

- Advertisement -

शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील या अत्यंत काळया घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या 631 शेतकर्‍यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किसान शहीद अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार आहे.

देशभर अशा यात्रा काढून शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विविध संघटनांच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येत आहे.

लखीमपूर खेरी येथील शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले असून शेतकर्‍यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या अस्थिंच्या कलशांच्या यात्रा दि. 27 ऑक्टोबरला सुरू होतील.

जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत या यात्रा दि. 18 नोव्हेंबरला मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचतील व मुंबईत भव्य सभा घेऊन या अस्थी महाराष्ट्राच्या मातीत विलीन करण्यात येतील.

संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांचा यात समावेश आहे. यासाठी डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदी प्रयत्नशील आहेत.

असा असेल अस्थिकलश यात्रेचा मार्ग

१४ नोव्हेंबर : नंदुरबार/धुळे

१५ नोव्हेंबर : नाशिक

१६ नोव्हेंबर : अहमदनगर

१७ नोव्हेंबर : ठाणे/पालघर

१८ नोव्हेंबर : मुंबईत समारोप.

- Advertisment -

ताज्या बातम्या