Thursday, March 13, 2025
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगी जखमी

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

ओझे l वार्ताहर Oze

लखमापुर येथील शिंदे वस्ती येथे आज सायंकाळच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय गुंजन जखमी झाली असून तिला उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे.

- Advertisement -

सायंकाळी शाळा सुटल्यानंतर गुंजन नेहमीप्रमाणे द्राक्ष बागेत काम करणाऱ्या आपल्या आईकडे येत असताना जवळच टोमॅटोच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावरती हल्ला करत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी मुलीला बघून तिच्याकडे येणाऱ्या आईने हे दृश्य बघताच हातातील विळा घेऊन बिबट्याकडे धाव घेताच बिबट्याने आपल्या तोंडात पकडलेल्या मुलीला सोडून देत उसाच्या शेताकडे पळ काढला.

मात्र या हल्ल्यात गुंजन च्या मानेला दोन दात व मोठी जखम झाल्याने तिला प्राथमिक उपचार करण्यासाठी येथीलच दिघे हॉस्पिटलमध्ये नेऊन नंतर दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. पुढे प्राथमिक उपचारानंतर पुन्हा गुंजनला जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले असून गुंजन वर अधिक उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या सुधारत आहे .

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सदर घटनेची माहिती परिसरात मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बिबट्याला पकडण्याची मागणी केली लखमापूर परिसरात गेल्या काही वर्षापासून बिबट्याचे हल्ले दिवसागणित वाढतच आहे अनेकदा पिंजरे लावू नये बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांनी व वनविभागाने बिबट्या पुढे हात टेकल्याचे चित्र दिसत आहे मात्र बिबट्याच्या हल्ल्यात जखमी व मृत होणाऱ्या घटना या थांबण्याचे नाव घेत नाही यामुळे याकडे कायमस्वरूपी उपचार होण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे गुंजन वरील बिबट्याच्या हल्ल्याने सगळीकडे हळ-हळ व्यक्त होत असली तरी आईने केलेले या धाडसाचे नागरिक कौतुकही होत आहे

जखमी गुंजन ला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पडली बंद
दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गुंजनला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात सरकारी रुग्णवाहिकेने घेऊन जात असताना रुग्णवाहिका थेट रस्त्यातच बंद पडल्याने तब्बल मोठा विलंब झाला शेवटी गुंजन यांचे वडील बापू शिंदे यांनी मुलीची अवस्था पाहून रुग्णवाहिकेची वाट न पाहता खाजगी वाहनाने तिला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यातूनच रुग्णालय परिसरातील असलेल्या रुग्णवाहिकेचा हा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवाशी खेळ करतोय का असा प्रश्न पडतो. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला असून आजही लखमापूर परिसरातच तीन पिंजरे यापूर्वीच लावलेले आहे यातील काळे वस्ती, दहेगाव रोड व दहेगाव येथे पिंजरे लावण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...