Friday, May 3, 2024
Homeनगरविडी कामगारांच्या जागेची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न

विडी कामगारांच्या जागेची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील मध्यवर्ती भागात नालेगाव येथे असलेल्या पद्मपुरी विडी व विणकर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना विश्वासात न घेता, तसेच संस्थेचा कोणत्याही प्रकारचा ठराव न करता संस्थेची कोट्यवधी रुपयांची सुमारे तीन एकर जागा परस्पर विकण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. संस्थेचे प्रवर्तक व भाजप नगरसेवक यांनी संस्थेच्यावतीने रजिस्टर साठेखत करून दिले असून, याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे आक्षेप घेण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत संस्थेचे सभासद राजू गाली यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. नालेगाव येथील नियोजित पद्मपुरी विडी व विणकर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या (दुर्बल घटक) या संस्थेची 1 हेक्टर 20 आर जागा आहे. प्रवर्तक व नगरसेवक यांनी सभासदांना विश्वासात न घेता तसेच संस्थेचा ठराव झालेला नसताना पाच व्यक्तींबरोबर साठेखत दस्त नोंदवून 42.90 लाख रुपयांना ही जागा विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

खाठेखताचा हा व्यवहार सभासदांना मान्य नाही. तसेच सभासदांनी साठेखत करण्याबाबत ठराव मंजूर केलेला नाही. त्यामुळे हे साठेखत बेकायदेशीर असून त्यास सभासदांना विरोध आहे. या जागेच्या खरेदी-विक्रीची कार्यवाही करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या