Friday, May 3, 2024
Homeनाशिकलता दिदींच्या जीवनपटावर चित्रपट बनवणार

लता दिदींच्या जीवनपटावर चित्रपट बनवणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आपल्या दैवी सुरांनी कोट्यवधी लोकांच्या कानांना ज्यानी तृप्त केले त्या लत्तादिदींचे जीवन (lata mangeshkar) अत्यंत संघर्षमय आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास आम जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचा आपला मानस असून त्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची आपली तयारी आहे,असे प्रतिपादन गरुडझेप अकॅडमीचे संचालक प्रा. सुरेश सोनवणे (prof suresh sonawane) यांनी केले….(will make a movie on lata mangeshkar life and her dedication)

- Advertisement -

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गंगापूर धरणाच्या निसर्गमय वातावरणात असलेल्या गरुडझेप अकॅडमीतर्फे (Garudzep academy) सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रा.सोनवणे बोलत होते.

प्रा.सोनवणे हे लत्तादीदी यांचे चाहते आहेत.दीदींच्या गाण्यांची त्यांच्यावर इतकी मोहिनी होती की श्रद्धांजली सभेत बोलतांना आणि लत्तादीदींच्या जीवनाचे एकेक पैलू उलगडून दाखवितांना ते अत्यंत भावूक झाले होते.

आपल्या सुरांनी त्यांनी 70 वर्षे त्यांनी संगीतसृष्टीवर राज्य केले.आपले संपूर्ण जीवनच त्यांनी या क्षेत्रासाठी अर्पण केले.त्यांनी विविध भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली.वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलून त्यांना स्थिरस्थावर केले.

सुरुवातीच्या काळातील संघर्षानंतर त्यांनी याशाचे इतके मोठे शिखर गाठले की तोपर्यंत कुणीच पोहोचू शकणार नाही. देशाचा सर्वोच्च भारतरत्नसह त्यांना इतके पुरस्कार मिळाले की त्याची गिनतीच करता येणार नाही.

अशी महान विभुती लाभली हे आपल्या देशाचे भाग्यच असून त्यांचे जीवन सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीच त्यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचा मानस असल्याचे प्रा.सोनवणे यांनी शेवटी स्पष्ट केले. प्रारंभी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून उपस्थितांनी लत्तादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण डोळस यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या