Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनLata Mangeshkar : लतादीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Lata Mangeshkar : लतादीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई | Mumbai

चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar passes away) यांचे निधन झाले आहे.

- Advertisement -

वयाच्या ९३ व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी ८.१२ वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

मागील ८ जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital Mumbai) आयसीयूत (ICU) त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना करोनाची (COVID19) लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PNarendra Modi) लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहे. दुपारी साडे चार वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) संध्याकाळी ६.३० वाजता लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

- Advertisment -

ताज्या बातम्या