Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रसर्वधर्मीय नागरिकांनी पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना घरातच करावी – अजित पवार

सर्वधर्मीय नागरिकांनी पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना घरातच करावी – अजित पवार

मुंबई – कोरोनविरुद्धच्या लढाईसाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे. तसेच येणाऱ्या काही दिवसात असणारी महावीर जयंती, हनुमान जयंती व शब्ब-ए-बारातसाठी नागरिकांनी घराच्याबाहेर पडू नये व यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केले आहे.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देशाच्या अस्तित्वाची लढाई असल्याने कायदे व आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...