Thursday, July 2, 2026
Homeनगरकॅश व्हॅनमधून पाच लाख चोरले

कॅश व्हॅनमधून पाच लाख चोरले

अहमदनगर (प्रतिनिधी) – एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधून व्हॅनच्या चालकाने पाच लाख रूपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात व्हॅन चालक नितीन पोपट दरंदले (वय- 45 रा. हिंगणगाव ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओरिएंटल बँकेच्या सावेडी येथील एटीएममध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास किरण मच्छिंद्र गायकवाड (रा. भिस्तबाग) हे कॅश व्हॅनमध्ये 53 लाख रूपये रक्कम घेऊन आले होते. या व्हॅनवर दरंदले चालक होता. गायकवाड एटीएममध्ये कॅश भरत असताना चालक दरंदले याने व्हॅनमधून पाच लाख चोरून नेले. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे करत आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...