Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर : बायपाससाठी अडविला हायवे

नगर : बायपाससाठी अडविला हायवे

अहमदनगर (प्रतिनिधी) – बायपास रोडचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी आज सोलापूर हायवे अडविला. रस्त्यावरील फुपाटा उडून शेतपिकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही यावेळी शेतकर्‍यांनी केला. नगर-सोलापूर रोडवरील वाळूंज येथे आज शुक्रवारी सकाळी हे आंदोलन झाले. बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

15 दिवसाच्या आत वाळूंज बायपास रस्ताचे काम सुरू होईल व काम सुरू असताना रोडवर पाणी मारून फुपाटा दाबला जाईल असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले. नगर सोलापूर महामार्गावरील वांळुज ( ता. नगर ) ते नगर मनमाड बायपास रोडचे काम सुरू आहे. विळद पासून वांळुज शिवारापर्यत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. वाळुंज येथे काम येताच ठेकेदाराने काम बंद केले. दीड किलोमीटरचे काम वाळूंज शिवारात होणे बाकी आहे.काम थांबल्याने रस्त्यावरील धूळ कडेच्या घरे आणि शेतपिकांवर उडून नुकसान होत आहे.

- Advertisement -

रस्ता तत्काळ दुरुस्त करावा असे निवेदन महादेव शेळमकर व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्याची दखल न घेतल्यामुळे वांळुजचे गावकरी रस्त्यावर उतरले अन् त्यांनी सोलापूर हायवे अडवित आंदोलन केले. गावातील महिलांनी पुढाकार घेत ट्रक अडविल्या. गावकर्‍यांनी एकजुटीने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याला घेराव घालत काम पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली .

- Advertisment -

ताज्या बातम्या