Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर – कोरोणा ग्रस्तांसाठी जिल्हा बँकीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची...

नगर – कोरोणा ग्रस्तांसाठी जिल्हा बँकीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची मदत

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – संपूर्ण जगामध्ये तसेच भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे राज्यात देखील सामान्य जनजीवन बाधित केलेले असून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्ताना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत करण्यासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तसेच बँकेच्या सर्व सेवकांनी एक दिवसाचा पगार असा एकूण २५ लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व बँकेचे संचालक रावसाहेब शेळके यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत सोलेपाटील हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...