Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब लोणीत

जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब लोणीत

आता प्रतीक्षा केवळ राज्य शासनाच्या परवानगीची -डॉ. राजेंद्र विखे

लोणी (वार्ताहर) – फक्त सहा दिवसांत कोविड 19 साठी नवीन हॉस्पिटल उभारणार्‍या येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता राज्यात वैद्यकीय अभिमत विद्यापीठात व अहमदनगर जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब स्थापन केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर येथे कोरोनाच्या टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

सध्या कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ आणि शक्ती अधिक लागते. हे टाळण्यासाठी कोरोना चाचणीचे तंत्रज्ञान संस्थेत उभारण्यात आले. या टेस्ट लॅब मशिनच्या प्रशिक्षणास आज डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्याहस्ते सुरुवात झाली. याप्रसंगी मायक्रोबायोलॉजीचे डॉ. शरियार रोशनी, डॉ. रवींद्र कारले व मॉलबायो कंपनीचे प्रतिनिधी विवेक अलाट व राजन गावडे उपस्थित होते.

यावेळी डॉ. विखे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या साह्याने राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा व देशावर असलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य करण्याच्याद़ृष्टीने आम्ही या यंत्रणा उभारल्या आहेत. या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचे या कालखंडातील सकारात्मक पाऊल आहे. या लॅब आधुनिक प्रकारातील असून यात एकाचवेळी चार टेस्ट घेणे शक्य होणार आहे.

लॅबमुळे कोरोनाच्या रोज 24 तासांत 120 टेस्ट करता येणार आहेत. शासनाच्या मान्यतेनंतर या सेवा नागरिकांना उपलब्ध असतील. कोरोना विरुध्दच्या या लढाईत आम्ही सज्ज आहोतचं. पण नागरिकांना इथंपर्यंत यायची वेळ येऊ नये. यासाठी ‘घरीचं रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या