अहमदनगर (प्रतिनिधी) – आज जिल्ह्यात ०२ दोन करोनाबाधित आढळले आहे. तर १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.
या रुग्णामध्ये मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला तर वाशी मुंबईहून आलेल्या मेरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २१७ झाली आहे. या एकूण रुग्णामध्ये संगमनेर येथील खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या ०३ रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश आहे.
- Advertisement -
जिल्ह्यातील १५ व्यक्ती करोनामुक्त
आज त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला. यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.




