Thursday, July 2, 2026
Homeनगरसव्वा दोन लाख शेतकर्‍यांसाठी 1 हजार 373 कोटी रुपये प्राप्त

सव्वा दोन लाख शेतकर्‍यांसाठी 1 हजार 373 कोटी रुपये प्राप्त

कर्जमाफीची प्रक्रिया सुरू : आधार प्रामाणिकरण अंतिम टप्प्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत सोमवार अखेर नगर जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांसाठी 1 हजार 373 कोटी रुपये जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान पात्र शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून अवघ्या 18 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे प्रामाणिकरण शिल्लक आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. शनिवार अखेर जिल्हा बँकेच्या पात्र शेतकर्‍यांसाठी 1 हजार 24 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जवळपास हे पैसे पात्र कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. सोमवारी त्यात वाढ होऊन हा आकडा 1 हजार 167 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. जिल्हा बँकेच्या 2 लाख 4 हजार 278 तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या 19 हजार 954 शेतकर्‍यांसाठी सोमवारअखेर 1 हजार 373 कोटी रुपये कर्जमाफी पोटी मिळालेले आहेत. यात राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांसाठी 206 कोटी रुपये आलेले आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या आधार प्रामाणिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 94 टक्के शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रामाणिकरण झाले असून अवघ्या 18 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण बाकी असल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

धक्कादायक! उघड्या मॅनहोलने घेतला एकाचा बळी; २० फूट अंतरावर सापडला मृतदेह,...

0
मुंबई | Mumbai राज्यातील काही जिल्ह्यांत काल (बुधवारी) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) देखील पावसाने (Rain) हाहाकार घातला असून, पावसामुळे (Rain) एक...