Thursday, July 2, 2026
Homeनगरगोळी झाडून तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून तरुणावर गोळी झाडून खून केल्याप्रकरणी सुमारे 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील अशोकनगर परिसरातील लाटे वस्ती येथे मंगल भाऊसाहेब काळे हिने राहण्यासाठी घेतलेल्या जागेतील वादामुळे राजू गांगुर्डे, डँडी वायकर, धोंडीराम इंगळे, गजानन उर्फ बाबासाहेब गांगुर्डे, शरद वायकर, राजू वायकर, माधव वायकर, सागर वायकर, बंडू गंगावणे, गबू वायकर, सागर गणेश इंगळे, शाम वायकर, पार्वतीबाई गांगुर्डे, सविता राजेंद्र गांगुर्डे, धोंडीरामची बायको (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. लाटे वस्ती, अशोकनगर ता. श्रीरामपूर) यांनी एकत्र मिळून पिस्तुल, टिकाव, कुर्‍हाड, तलवार, कोयता, पाईप, गज, लाकडी दांडके, फावडे, लोखंडी पहार, विटा आदी हत्यारांचा वापर करून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच गणेश गवळीराम साळवे (वय 28) यास डॅडी वायकर याने डोक्यात कुर्‍हाड मारून जखमी केले व राजू गांगुर्डे याने त्याच्याकडील पिस्तूलमधून गणेश याच्या छातीवर गोळी मारून त्याचा खून केला व इतरांनी फिर्यादीच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी हौशीराम गवळीराम साळवे (वय-40, रा.लाटे वस्ती, निपाणी वडगाव शिवार, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. नं. 950/2020 प्रमाणे भा.द.वि. कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 7, 25 नुसार वरील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट करत आहेत.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...