Friday, July 3, 2026
Homeनगरपंचायत राजमध्ये 17 हजारांहून अधिक लढवय्ये ‘आरोग्य दूत’!

पंचायत राजमध्ये 17 हजारांहून अधिक लढवय्ये ‘आरोग्य दूत’!

प्रसिध्दीपासून दूर राहत ग्रामीण भागात लढत आहेत कोरोना विरोधात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगभरात कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासोबत नव्याने कोरोनाची लागण होऊ नयेत, यासाठी स्वतंत्रपणे व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या टप्प्यात शहरी भाग कोरोना संसर्गाच्या विळख्यात असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भाग अद्याप सुरक्षित आहेत. या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेचे 17 हजारांहून अधिक लढवये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे झुंजतांना दिसत आहेत. ना गाजावाजा अशा पध्दतीने हे कर्मचारी ‘आरोग्यदूत’ म्हणूनच काम करत आहेत. यात आरोग्य विभागापासून गावातील स्वच्छता कर्मचार्‍यांपर्यंत साखळीच कार्यरत आहे.

- Advertisement -

महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारे जवळपास संमिश्रपणे कोरोनाबाधीत आणि संशयीत रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे. यासह शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात परिस्थिती बरी आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अंगणवाडी बालकांपासून ते प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येत आहे. त्यांना घरपोच आहार देण्यासोबत, आशा स्वयंसेविका घरोघरी फिरून आरोग्य विषयक माहिती आणि अहवाल तयार करत आहेत.

यासह जिल्हा परिषदेच्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 555 केंंद्रातून ग्रामीण जनतेला आरोग्याचे धडे देेण्यात येत आहेत. जिल्ह्यात 1 हजार 317 ग्रामपंचायती असून त्या ठिकाणी गाव पातळीवर सफाई कर्मचार्‍यांपासून ते संबंधीत गावाला पाणी पुरवठा करणार्‍या कर्मचारी हे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा जीवाची पर्वा न करता आपले काम चोख पध्दतीने निभावत आहे. साधारण महिनाभरापासून जिल्ह्यातील गावेच्या गावे लॉकडाऊन असताना ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेसह अन्य सुविधा देण्यात ग्रामपंचायती यशस्वी ठरलेल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक गावे मिळून एखदा दुसरा पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. अशीच अवस्था महसूल आणि राज्यच्या कृषी विभागाची असधि अन्य शासकीय विभागाची आहे.

मात्र, पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन स्तरातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक आणि गावच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच यांच्यापासून गावातील स्वच्छता कर्मचारी अशी साखळीच कोरोना विरोधात यशस्वीपणे लढा देत आहेत. मात्र, हे काम करतांना हे सर्व घटक शांतपणे प्रसिध्दीपासून दूर आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील या साखळीतील एकही कडी निसटली तर त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या आरोग्यावर होण्याचा मोठा धोका आहे.

  • पंचायत राज व्यवस्थेतील कार्यत कर्मचारी
  • जिल्हा परिषदेकडील 210 वैद्यकीय अधिकारी
  • जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत 600 नर्स
  • जि.प. आरोग्य विभागात कार्यतर पुरूष आरोग्य सेवक 600
  • 4 हजार 631 अंगणवाडी सेविका, 4 हजार 444 मदतनीस
  • 3 हजार 176 आशा स्वंयसेविका
  • विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक 1 हजार 93
  • ग्रामपंचायात आकृतीबंधानुसार कर्मचारी संख्या 2 हजार 774

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...