Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedमनोबल वाढवणारा झी टॉकीज प्रस्तुत “तू चल पुढं” फिल्म फेस्टिवल

मनोबल वाढवणारा झी टॉकीज प्रस्तुत “तू चल पुढं” फिल्म फेस्टिवल

मुंबई : करोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आणि सकारात्मक राहण्याची गरज आहे. घरात बसून राहण्याचा सर्वांनाच कंटाळा आलेला आहे. पण या संकटापासून वाचण्याचा हा एक मेव पर्याय आहे. २४ तास घरात बसल्या मुळे सर्वजण खचून गेले आहेत.

या कठीण काळात झी टॉकीज प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आपण या संकटासोबत लढू आणि यावर नक्कीच विजय मिळवू अशी आशा सर्वांनी बाळगणे महत्वाचे आहे.

- Advertisement -

आपल्या प्रेक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे ”तू चाल पुढं ” फिल्म फेस्टिवल. १५ जुन ते १९ जुन रोजी दररोज संध्यकाळी ७ वाजता मनोबल वाढवणारे आणि लढण्याची प्रेरणा देनारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या फिल्म फेस्टिवल ची सुरुवात होत आहे “पळशीची पेटी” या प्रेरणादाई चित्रपटाने. एका मेंढपाळाची मुलगी धावपटू बनण्यासाठी कशी धडपड करते हे या चित्रपटातून आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.

एक वयोवृद्ध माणूस तृतीयपंथी लोकांना जीवन जगण्यासाठी कसं प्रेरितकरतो, लोकांची विचारसरणी बदलण्यात ते यशस्वी होतात का हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरु नका “जयजयकार” १६ जुन रोजी. ३ मुली, ज्या झुंज देत आहेत आपल्याच वडिलांविरोधात, ज्यांना वंशाचा दिवा म्हणून एक अपत्य हवं आहे. पाहायला विसरु नका “मोकळा श्वास” १७ जुन रोजी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या कुटुंबाची कथा, पाहायला विसरू नका “तानी” १८ जुन रोजी.

या फिल्म फेस्टिवल ची सांगता होणार आहे “दे धक्का” या सुपरहिट चित्रपटाने. नृत्य स्पर्धेत भाग घेतलेल्या सायलीला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या गावातून मुंबई पर्यंत च्या प्रवासात अनेक अडचणी येतात. प्रवासात येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली जाते. हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका “दे धक्का” १९ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.

- Advertisment -

ताज्या बातम्या