Thursday, May 2, 2024
Homeनगरब्राम्हणी, जखणगाव शेतकर्‍यांना सर्वप्रथम कर्जमाफीचा मान

ब्राम्हणी, जखणगाव शेतकर्‍यांना सर्वप्रथम कर्जमाफीचा मान

उद्या अंमलबजावणी, 28 तारखेला जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया

अहमदनगर (वार्ताहर)- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत केलेल्या कर्जमाफीसाठी प्रायोगिक चाचणीसाठी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी आणि नगर तालुक्यातील जखणगाव या गावांची निवड केली आहे. याठिकाणी गुरूवारी जिल्हा बँकेतील सर्व खातेदारांची प्रायोगिक तत्वावर कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर 28 फेबु्रवारीला नगरसह राज्यात एकाचवेळी कर्जमाफी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.

- Advertisement -

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 30 सप्टेंबर 2019 अखेरच्या थकित व पुनर्गठित केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे काम जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे.

राज्यातील महाविकास आघाडीची कर्जमाफी योजना ही आधारबेस आहे. त्यामुळे थकीत कर्जदार शेतकर्‍यांचे आधार लिंक करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्जदारांना आधार प्रामाणिकरणासाठी बोयोमेट्रिक मशिन जिल्हा बँकेच्या 297 शाखेत उपलब्ध करण्यात आले आहेत. सहकार खात्याने आतापर्यंत कर्जमाफीसाठी राबविलेल्या प्रक्रियेत नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.

गुरूवारी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी आणि नगर तालुक्यातील जखणगावात असणार्‍या जिल्हा बँकेच्या खातेदारांची कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पूर्वी सहकार खाते आणि जिल्हा बँकेने प्रायोगिक तत्वावर संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात आधार नोंंदणीचे प्रामाणिकरण केलेले आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सहाकर खात्याच्या आदेशानूसार गुरूवारी ब्राम्हणी आणि जखणगावातील शेतकर्‍यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

अशी होणार कार्यवाही…
ब्राम्हणी गावात जिल्हा बँकेचे 848 खातेदार शेतकरी असून जखणगावात बँकेचे 143 शेतकरी सभासद आहेत. यात सरकारच्या कर्जमाफीत पात्र नसणार्‍यांना वगळून उर्वरित शेतकर्‍यांना बँकेत बोलावून त्यांच्या आधार नोंदणीनुसार त्यांच्या कर्जखात्याची माहिती आणि कर्जाचे प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कर्जदार शेतकर्‍याला त्याच्या कर्जाची माहिती मान्य झाल्यास त्यांचे नाव पोर्टल व कर्जमाफीच्या लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या