नेवासा (तालुका प्रतिनिधी) — तालुक्यातील माळीचिंचोरा येथील मुळा कालव्यामध्ये मायनर नंबर एक मध्ये वांढेकर वस्तीजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर इसम हा 55 वर्षे वयाचा असल्याचे समजते. अंगात पांढरा शर्ट, तोंडाला फडके बाधलेले आहे. याबाबत कालवा निरीक्षक यांनी दिलेल्या खबरी वरून नेवासा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोढवे हे करीत आहे.
नेवासा : माळीचिंचोरा शिवारातील कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला
ताज्या बातम्या
चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...
शिर्डी । प्रतिनिधी
शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...




