पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी व ऊसतोड कामगाराची मुलगी गिर्यारोहक कुमारी अर्चना बारकू गडदे हिने 26 जानेवारीला ठाणे जिल्ह्यातील जीवधन किल्ल्याच्या शेजारी व नाणेघाट येथे असणारा वानरलिंगी हा 450 फूट असणारा सुळका सर करून वर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा फडकवत भारत मातेला सलामी दिली. तर 27 जानेवारीला नानाचा अंगठा सर करून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक स्व. अरुण सावंत यांना पॉइंट ब्रेक अॅडवेंचर टीमने श्रद्धांजली अर्पित केली.
शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी गिर्यारोहक अर्चना बारकू गडदे हिने सलग तीन दिवस तीन वेळा वजीर सुळका सर करून महाराष्ट्रातली पहिली मुलगी होण्याचा मान पटकावला होता. ठाणे जिल्ह्यामध्ये वाशी तालुक्यात दुर्ग व माउली किल्लयाशेजारी असणारा वजीर सुळका जो 280 फूट आहे. व राजमाता जिजाऊ जयंती लिंगाणा किल्ल्यावर साजरी केली होती.
त्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण साडेतीन हजार फुटापेक्षा जास्त आहे. 26 जानेवारी 2020 ला जीवधन किल्ल्याच्या शेजारी नाणेघाट येथे असणारा वानरलिंगी हा 450 फूट उंच असणारा सुळका सर करून वर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा फडकवत भारत मातेला सलामी दिली. 27 जानेवारीला नानाचा अंगठा सर करून नुकतेच निधन झालेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक स्व. अरुण सावंत यांना पॉइंट ब्रेक अॅडवेंचर टीमने श्रद्धांजली अर्पित केली.त्यामध्ये अर्चना गडदे हीचा सहभाग होता.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शिक्षक यांनी अभिनंदन केले. भविष्यात तिचे सगळ्यात उंच शिखर माउंट एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न आहे.नाशिक येथील पॉइंट ब्रेक अॅडवेंचर या टीममुळे मला हे सगळं करणे शक्य झालं असल्याचे तिने सांगितले.