Friday, May 3, 2024
Homeनगरपंतप्रधान सहाय्यता निधीसाठी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडून एक कोटी

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडून एक कोटी

अहमदनगर – कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की, कोरोना बाधीतांच्या उपायांकरीता पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वानी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहानाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था आणि सामान्य नागरीक पुढे आले आहेत.पंतप्रधानाच्या या सहाय्यता निधीत योगदान म्हणून आपणही १कोटी रूपयांचा निधी जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डाॅ.विखे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या