Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबीकेसी येथे देशातील पहिल्या ओपन हॉस्पिटलची उभारणी; जम्बो सुविधांची निर्मिती!

बीकेसी येथे देशातील पहिल्या ओपन हॉस्पिटलची उभारणी; जम्बो सुविधांची निर्मिती!

मुंबई : शहरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना या पार्श्वभूमीवर बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल उभारले आहे. याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

दरम्यान देशभरात करोनाचा प्रभाव कमी जास्त होताना दिसून येत आहे. परंतु राज्यात याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई शहर आघाडीवर असून यासाठी स्थानिक प्रशासन जोरदार उपाययोजना करण्यातत येत आहे. महालक्ष्मी येथे करोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यात ६०० बेड्सची सुविधा आणि १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड-१९ चे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

- Advertisement -

तर नेस्को गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे. तसेच रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात उभारण्यात येतील.

शहरातील ठिकठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत. ३१ मे पर्यंत एनएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेस्को, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था तर अशी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक उभारण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या