Monday, May 6, 2024
Homeनगरनगरसाठी विशेष डॉक्टरांचे पथक

नगरसाठी विशेष डॉक्टरांचे पथक

डॉ. सापळे, चव्हाण यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)– अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे डॉक्टर्स संबंधित जिल्ह्यांत जाऊन कोरोनाच्या उपचारपद्धती बरोबरच तांत्रिक मार्गदर्शनही करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण यांची अहमदनगर जिल्ह्यासाठी नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉ. श्रीराम गोसावी आणि याच महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अजय सुभेदार हे मालेगाव येथे जाऊन कोव्हिड-19 च्या नियंत्रणाचे काम पाहतील. सोलापूर येथील डॉ.वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि याच महाविद्यालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रसाद यांची सोलापूर येथील कोव्हिड19 नियंत्रणासाठी उपचार आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या