Friday, May 3, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री ठाकरे ३० जानेवारीला नाशकात; जिल्ह्याचा आढावा घेणार

मुख्यमंत्री ठाकरे ३० जानेवारीला नाशकात; जिल्ह्याचा आढावा घेणार

नाशिक । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे येत्या 30 जानेवारीला नाशिक दौर्‍यावर असून ते विभागातील पाचही जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. त्यात  विविध प्रकल्प, योजनांची स्थिती व प्रगतीची माहिती घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही आढावा बैठक होईल. दरम्यान, दुसर्‍या दिवशी 31 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे देखील नाशिक दौर्‍यावर असून ते देखक्षल विभागाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांचा हा दुसरा नाशिक दौरा असेल. विभागातील नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नगर या जिल्ह्यांमधील विकासकामाचा ते आढावा घेतील. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन त्यांच्या करुन माहिती घेतील. बैठकीत पीकविमा, समृद्धी महामार्ग, अवकाळी निधी वाटप, नूतन आर्थिक वर्षाचा जिल्हा नियोजन अांराखडा, गत आराखडयातील अखर्चित निधी याबाबत ते सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन करणार आहे.

शिवाय येत्या 26 जानेवारीपासून शिवभोजन थाळी योजना लागू होणार असून त्यांचा देखील ते आढावा घेतील. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार हे नाशिक दौर्‍यावर येणार असल्याने महसूल अधिकारी कामात जुंपले आहे. नूकत्याच झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या अखर्चित निधीवरुन यंत्रणेला धारेवर धरले होते. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापुढे ‘मागचे पाढे पंचावन्न’ नको म्हणून यंत्रणा कामला लागल्याचे पहायला मिळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या