त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या पर्यटक अखेर बाहेर पडत आहेत. रविवारी (दि.१४) प्रसिद्ध असलेल्या पहीणे येथे करोनाच्या सावटाखाली पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला.
सध्या सगळीकडे करोनाचा प्रभाव असतानाही पर्यटकांचे पाय मात्र त्र्यंबकेश्वरकडे वळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार चालू असल्याने निसर्ग बहरला आहे. परंतु लॉक डाऊनमुळे नागरिक बाहेर पडत नव्हते. परंतु आता करोनाला न जुमानता पर्यटकांनी पहीणे सह, अंबोली रोड घाट दुगारवाडी धबधबा, ब्रम्हगिरी प्रदक्षणा मार्ग, वैतरणा डम परिसर या भागात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
तर लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या तरुण तरुणीही या ठिकाणी दिसून आल्या. सदर ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेलही सुरू झाले. दरम्यान यावेळी सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडालेला पहायला मिळाला. त्याचबरोबर नागरिक स्वतःची काळजी घेणे देखील विसरल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाळ्यात अनेक हौशी पर्यटक येत असतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी सर्वच सार्वजनिक , वर्दळीच्या ठिकाणी घ्यावयास सांगितली आहे. त्यामुळे वरील भागात सॅनिटायझर गेट उभारणे गरजेचे आहे. तसेच भागातही जंतुनाशक फवारणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे.




