Friday, May 3, 2024
Homeनाशिककोराेनाला थाेपविण्यासाठी वाढवा राेगप्रतिकार शक्ती; पंतप्रधानांनी दिली सप्तपदी

कोराेनाला थाेपविण्यासाठी वाढवा राेगप्रतिकार शक्ती; पंतप्रधानांनी दिली सप्तपदी

नाशिक : देशात कराेना व्हायरसचा प्रसार वाढत असून या व्हायरसला राेखण्यासाठी माणसाने शरीरीतील राेगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबाेधित करतांना कराेना राेखण्यासाठीचे सात सूत्रे अर्थात सप्तपदी दिली. यात प्रामुख्याने राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयानेदेखिल राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सहज व साेपे असे घरगुती उपाय दिले आहेत, त्यातून राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत हाेईल, असे वैद्य विक्रात जाधव यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

देशातील करोना विषाणूच्या संसर्गामुळे ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिनांक ७ एप्रिल रोजी एक विशेष मार्गदर्शन पर पत्रक जारी केले असून त्यामध्ये व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीय ग्रंथकारांनी सांगितलेले उपाय जनतेसाठी स्पष्ट करण्यात आले आहेत. हे उपाय अत्यंत साधे आणि घरगुती स्वरूपाचे असले तरीदेखील घसा खवखवणे व खोकला अशी लक्षणे दिसल्यास मात्र त्वरित वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याचे सूतोवाच देखील आयुष मंत्रालयाच्या पत्रकामध्ये केले आहे.

कोराेनावर सध्या कोणताही खात्रीशीर इलाज किंवा उपचार उपलब्ध नसल्याने या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपली प्रतिकारशक्ती वाढावी या दृष्टीने हे पत्रक आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. आयुष मंत्रालयाच्या या पत्रकावर वैद्य देवेंद्र त्रिगुणा, वैद्य बालकृष्णन, वैद्य जयंत देवपुजारी, वैद्य विनय वेलणकर, वैद्य तनुजा नेसरी इत्यादी देशभरातील मान्यवर वैद्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

हे करावे

१)दररोज सकाळी व संध्याकाळी गरम पाणी प्यावे.
२)दररोज सुमारे तीस मिनिटे योगासने प्राणायाम आणि ध्यान धारणा करावी.
३)राेजच्या आहारात हळद, जिरे, धणे व लसूण या गोष्टींचा वापर करावा.
४)फळे भाज्या खावात. शिळे अन्नपदार्थ खावू नये.
५)थंड पाणी पिऊ नये.
६)फॅनखाली झाेपू नये.

व्याधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुषच्या पत्रकातील सामान्य उपाय
1)दररोज सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करावे. मधुमेही व्यक्तींनी साखर विरहित च्यवनप्राश घ्यावा.
२)तुळस, दालचिनी, काळे मिरे, सुंठ, मनुका आणि गूळ यांचा काढा करून दररोज घ्यावा. त्यामध्ये आवश्यक असल्यास लिंबाचा रस घालावा.
३)150 मिली गरम दूध आणि त्यामध्ये एक चमचा हळदीचे चूर्ण टाकून त्याचे सेवन करावे.

साधे आयुर्वेदीय उपक्रम

१)तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल किंवा साजूक तूप दोन्ही नाकपुड्या मध्ये थेंब थेंब सोडणे.
२)तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल यांची गुळणी करावी त्यानंतर कोमट पाण्याने पुन्हा गुळणी करावी.
२)खोकला आणि घसा खवखवणे असा त्रास होत असल्यास पुदिना किंवा ओव्याची धुरी किंवा वाफ घ्यावी.
३)शुद्ध मधातून लवंगाचे चूर्ण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
४)वरील औषधे घेऊनही ही खोकला आणि घसा खवखवणे ही लक्षणे तशीच राहिल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आयुर्वेदिक काढा महत्त्वाचा

माणसाच्या शरीरातील फुफ्फुसांना शक्ती मिळावी, म्हणूण तुळस, कडुलिंबाची पाने, काळेमिरे, वेलची व दालचिनीचा काढा सकाळी व संध्याकाळी सेवन करावा. छातीसा तिलाचे तेल लावावे. यातून राेग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत हाेईल.

वैद्य डाॅ. विक्रांत जाधव, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या