Saturday, July 4, 2026
Homeनाशिकजिल्ह्यात १३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; शहरातील ०८ रुग्णांचा समावेश

जिल्ह्यात १३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; शहरातील ०८ रुग्णांचा समावेश

नाशिक : जिल्ह्यात आज नव्याने तेरा रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ०४ मालेगाव ०१ तर शहरातील आठ रुग्णांचा समावेश आहे.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास हे अहवाल प्राप्त झाले. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ११८७ वर पोहोचला आहे. तर शहरातील बाधितांची संख्या १९१ झाली आहे. तर ग्रामीण भागातील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

आज आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री 

नाशिक ग्रामीण मध्ये सटाणा शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात ३३ वर्षीय महिला व ३२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सिन्नर येथील दापुर येथे एक देवळा येथील दहिवड एकाचा समावेश आहे.

तर शहरातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मखमलाबाद रोड वरील २३ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, २१ वर्षीय पुरूष, तर कुथवड नगर येथील ३२ वर्षीय पुरुष व लेखा नगर येथील तीन, जुने नाशकातील एका रुग्णाचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Nashik Igatpuri Rain : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

0
इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri जुन महिना उलटूनही पावसाला सुरूवात झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने इगतपुरी...