Friday, May 3, 2024
Homeनाशिकआता महाबळेश्वरच्या धर्तीवर इगतपुरी हिलस्टेशन

आता महाबळेश्वरच्या धर्तीवर इगतपुरी हिलस्टेशन

नाशिक । लोणावळा, खंडाळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे, यासाठी अभ्यास सुरू असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प पाच वर्षांत रखडलेले आहे. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टूरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही काम आणि अपूर्ण असलेले काम आहेत त्यावर निश्चितपणे विषय घेणार आहोत. तसेच विमान सेवेबाबत काही अडचणी आहेत, त्यावर बोलणार आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, खा. शरद पवार साहेब, संजय राऊत, उद्धव ठाकरे अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी हे सरकार स्थापन केले आहे. मागील काही मतभेद बाजूला ठेऊन सरकारने काम करायला पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही. त्यामुळे सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही. यासाठी आपणही सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या