Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील १३०८ प्रवाशी श्रमिक ट्रेनने बिहारला रवाना

जिल्ह्यातील १३०८ प्रवाशी श्रमिक ट्रेनने बिहारला रवाना

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॅार्म चारवरुन आज बिहारसाठी दुपारी ४ वाजता श्रमिक ट्रेन रवाना झाली. नाशिक शहर, जिल्ह्यातील १३०८ प्रवासी त्यातून बिहारच्या निलकटिहारला रवाना झाले. या प्रवाशांमध्ये १२ बालके होते.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नाशिकरोडहून महाराष्ट्रातील पहिली ट्रेन रवाना झाली होती. येथून एकूण आठ श्रमिक ट्रेन रवाना झाल्या आहेत. आज बिहारला गेलेल्या ट्रेनव्दारा रेल्वेला नऊ लाख ५९ हजाराचा महसूल मिळाला. प्रत्येक तिकीट ७४० रुपयांचे होते अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

- Advertisement -

आज दुपारी नाशिक शहरासह जिल्ह्यातून एसटीने बिहारी प्रवाशांना नाशिकरोडच्या सिन्नरफाटा येथे आणण्यात आले. त्याची तपासणी करुन व अन्नपाणी देऊन रेल्वेमध्ये बसविण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदणी झालेले हे सर्व प्रवासी होते. एक जूनपासून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी लागणार नाही. ट्रक, बसव्दारे प्रवासी आपल्या राज्यात जाऊ शकतात. हे लक्षात घेता आता श्रमिक ट्रेन धावणार नाही असे सूत्रांनी सांगितले. त्याएवजी २ जूनपासून देशभरात दोनशे स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

नाशिकरोडला त्या थांबणार आहेत. आज स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य प्रमुख कुंदन महापात्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलिसचे अशोक जाधव तसेच विविध विभागांचे प्रमुख हजर होते. बंदोबस्त व नियोजन चांगले असल्यामुळे आज शेवटची श्रमिक टेन व्यवस्थित रवाना झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या