Thursday, July 2, 2026
Homeनाशिकसुरगाणा : ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

सुरगाणा : ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयातील एक ३० वर्षीय कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खबरदारी म्हणून सुरगाणा शहर रविवार पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

दरम्यान सदर कर्मचाऱ्याची मालेगाव येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये दहा दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. तेथील सेवा संपल्यानंतर या कर्मचाऱ्याला नियमाप्रमाणे होम काॅरंटाईन करण्यात आले होते. हि व्यक्ती मुंबई येथील घरी होमकॉरंटाईन संपवून सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात कामावर रुजू झाली.

- Advertisement -

याठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने या कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणी करिता पाठविण्यात आला. तोपर्यंत त्याचेवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले होते. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यास पुन्हा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. हा कर्मचारी ठीक असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने रविवार पर्यंत शंभर टक्के जनता कर्फ्यु लावण्यात आल्याचे घोषित केले आहे. केवळ दवाखाना, मेडिकल व शासकीय कार्यालये सुरू असतील. बाकी सर्व व्यवसाय बंद ठेवून गरज असेल तरच घरातील एका व्यक्तीने बाहेर पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

दरम्यान हा कर्मचारी आयटीआय जवळील सरकारी निवासस्थानी रहात असल्यामुळे गांधीनगर तसेच ग्रामीण रुग्णालय परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

यावेळी तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलिप रणवीर आदींनी परिसरात फिरून नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे व गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...