Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यातील सात व्यक्ती क्वारंटाईन

दिंडोरी तालुक्यातील सात व्यक्ती क्वारंटाईन

दिंडोरी : नाशिक येथील करोनाचा  संशयित रुग्ण दिंडोरी तालूक्यातील एका गावात येऊन गेल्याने त्याच गावातील सात व्यक्तींना दिंडोरी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान यातील कोणत्याही संशयिताचा अहवाल प्राप्त अद्याप कोणताही अहवाल या संशयितांचा झाला नसून चिंतेचे कारण नसल्याचे निदर्शनास येत आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असलेले पोलीस हवालदार कर्तव्यावर असतांना त्यांना करोनाची लागण झाली. करोनाचे निदान होण्यापुर्वी ते एकदा गावी आले होते. त्यानंतर त्यांना करोना झाल्याचे समजते. त्यांच्याबाबत माहिती जमा करतांना शासकिय यंत्रणेला ते गावी येऊन गेल्याचे समजले. त्यानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींना दिंडोरी येथील एका खाजगी रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. यास प्रांत डॉ.संदिप आहेर यांनी दुजोरा दिला आहे.

या सात व्यक्तींचा कोणताही वैद्यकिय अहवाल शासनाला प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या सातही  संशयितांची लक्षणे सामान्यच असुन अदयाप चिंतेचे कारण नसल्याचे समजते. परंतु हळुहळु करोना ग्रामीण भागातही पसरत चालला असल्याचे लक्षात येत आहे.

शहरात अदयाप करोना रुग्ण सापडलेला नसला तरी काही महाभाग मात्र निष्काळजीपणाने व्यवहार करीत असल्याने सामान्य नागरिकांसाठी धोका वाढला आहे. प्रशासनाने कितीही कठोर उपाययोजना करुनही अनेक नागरिक विनाकारण फिरतांना दिसत आहे. ठराविक लोक अजूनही मास्क वापरताना दिसत नाही.मास्क ना वापरणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तिसर्‍या टप्प्यात जनतेेने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याने कोणीही घराबाहेर पडु नये असे आवाहन सुजित मुरुकुटे, सचिन देशमुख, अविनाश जाधव, रणजित देशमुख,अ‍ॅड. प्रदिप घोरपडे,संतोष मुरकुटे, अ‍ॅड.शैलेश चव्हाण, निलेश गायकवाड, सुमित चोरडिया, नयन बुरड, सचिन आव्हाड, साजन पगारे, मयूर गांगोडे आदींनी  केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या