Friday, November 15, 2024
Homeनगरनिळवंडे कालवा कृती समितीचे उपोषण

निळवंडे कालवा कृती समितीचे उपोषण

पिण्याच्या पाण्याचा आरक्षण प्रस्ताव पाठवण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई

संगमनेर (प्रतिनिधी)- निळवंडे लाभक्षेत्रातील 182 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आरक्षण प्रस्ताव पाठवण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल, ठेकेदार कंपनीचे काम काढून घेण्याच्या मागणीसाठी काल मंगळवारी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

- Advertisement -

धरणातील 8.32 टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, सिन्नर या तालुक्यांतील 182 दुष्काळी गावांतील शेतकर्‍यांचे कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसभांचे ठराव असूनही, गेल्या अडीच वर्षात याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला नाही. अशा कामचुकार अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी व एक महिन्याच्या आत प्रस्ताव मंजूर करावा. अकोलेतील धरणाच्या कालव्यांची कामे नियमबाह्य पध्दतीने दिल्याचा आरोप करून, पात्र ठेकेदाराकडून तातडीने पूर्ण करावीत. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

सायंकाळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी निवेदन स्वीकारले तसेच जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रमोद माने यांनी या कामाची चौकशी करून कामात कसूर करणारे ठेकेदारांवर दंडात्मक कायदेशिर कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र दिले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अहिरे यांनी पाण्याच्या आरक्षणाबाबत नकारात्मक भुमिका असलेले पत्र देत संबंधित ग्रामपंचायतीने पाण्याच्या आरक्षणाची मागणी करणारा रितसर प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज व ठराव देण्यात यावा असे पत्र दिले. यावेळी कृति समिती अध्यक्ष रुपेंद्र काले, नानासाहेब जवरे, लाभक्षेत्रातील विविध गावातील 61 शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या