Thursday, May 2, 2024
Homeनगररेशनवरील ई-पॉश मशीन बंद करून सर्व कार्डधारकांना धान्य सुरू करा

रेशनवरील ई-पॉश मशीन बंद करून सर्व कार्डधारकांना धान्य सुरू करा

हिंदू एकता आंदोलन पक्षाची राहाता येथील बैठकीत मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) – मागील भाजप सरकारने गरिबांना रेशनवर धान्य देण्यासाठी जाचक अटी लादल्या होत्या. त्या शिथिल करण्यात याव्यात व केसरी कुपनधारकांना रेशनवर धान्य मिळावे अशा अनेक अटी शिथिल करण्याचा चांगला निर्णय अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला या निर्णयाचे स्वागत हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत लवकरच या निर्णयासाठी ना. छगन भुजबळ यांना भेटून पॉश मशीन बंद करण्याविषयी निवेदन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

रेशनवरील ई-पॉश मशीन बंद करून सर्व प्रकारच्या कार्डधारकांना धान्य सुरू करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाची शिवशक्ती हॉल नगर-मनमाड रोड राहाता येथे बैठक झाली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे व श्रीरामपूर शहराध्यक्ष मंगेश छतवाणी उपस्थित होते.

शहरी व ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो. परंतु गेल्या सरकारने नागरिकांना धान्य घेण्यासाठी पॉश मशीन ऑनलाईन वापरात आहेत. त्यामुळे ज्याला पाहिजे त्यांना धान्य मिळू शकत नव्हते. पुरवठा खात्यातील त्यांच्या खास मर्जीतील अधिकार्‍याशी सल्लामसलत करून धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कामातही अनियमितता असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या मशीनमुळे अनेकांना धान्य मिळण्यास विलंब झाला.

तर काही तांत्रिक बाबीची पूर्तता न केल्यामुळे अनेकांना धान्य मिळत नव्हते. याकडे पुरवठा खात्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे गरीब नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे राज्यातील गरीबांना ना. भुजबळ यांनी लक्ष घातले तर धान्य वितरीत करण्यासाठी ते महत्त्वाचे काम करतील, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. यासाठी भाजप सरकारने सुरू केलेले ई-पॉश मशीन रद्द करण्यात यावे, अशी मागणीही हिंदू एकता आंदोलन पक्षाने केली आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करावी तसेच केसरी शिधापत्रिका धारकांना पहिल्याप्रमाणे पुन्हा साखर मिळण्यासाठी निर्णय घ्यावा. भाजप सरकारने धान्यवाटप प्रणालीत लागू केेलेेले जाचक नियम शिथिल करावेत, पामतेल सुरू करावे, शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ पुन्हा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत देण्यासाठी नवीन आदेश जारी करावेत तसेच काही शहरात रॉकेल वितरण बंद करून ते फ्री सेल केले आहे ते पुन्हा रेशनवर सुरू करावे. मधल्या काळात रेशनिंगवर तूरडाळही निकृष्ट दर्जाची येत होती. ती शिजण्यासाठी वेळ लागत असल्याची तक्रार महाराष्ट्रात शिधापत्रिका धारकांकडून झाली होती.

त्यातही पहिल्या सरकारने लक्ष घातले नाही. यामध्ये ना. छगन भुजबळ यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. या बैठकीसाठी राहाता शहरप्रमुख जयराम क्षीरसागर, उपप्रमुख दत्तात्रय मंडलिक, जिल्हा संपर्कप्रमुख रवी सदाफळ, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, शिर्डी शहरप्रमुख गुरू भुसाळ, राजेंद्र जाधव, वसंत सापिके, सुभाष पिलगर, राजेंद्र भातपुते, भाऊसाहेब तांदळकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या